परळीचे बसस्थानक असुरक्षित, प्रवाशाच्या खिशातून २५ हजार रुपये लांबविले
बीड, 23 मार्च (हिं.स.)। परळी येथील बसस्थानकात मरळवाडी येथील प्रवासी मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चोरांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २५ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली. तालुक्यातील मरळवाडी येथील मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना च
परळी बसस्थानक


बीड, 23 मार्च (हिं.स.)।

परळी येथील बसस्थानकात मरळवाडी येथील प्रवासी मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चोरांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २५ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली.

तालुक्यातील मरळवाडी येथील मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चोरांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २५ हजार रुपये लांबविले. याप्रकरणी प्रवाशाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा संभाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तपास सहायक फौजदार नरहरी नागरगोजे करीत आहेत. परळी बसस्थानकात काही दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरीची घटना घडली होती. पुन्हा हा प्रकार घडला. दुसरीकडे परळी बसस्थानकासाठी २४ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर झाले असून, त्यांचे काम लवकरच सुरू होईल, असे आगारप्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले आहे.

परळी बसस्थानकात पाच महिन्यांपासून येथे सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बसस्थानक नूतनीकरणाचे काम एसटी महामंडळाने हाती घेतले असून, तीन महिन्यांपूर्वी येथे २४ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. परळीत अद्यापही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. सीसीटीव्हीसाठी आवश्यक केबल व एलईडी साहित्य उपलब्ध झाले असले तरी कॅमेरे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande