
पुणे, 23 मार्च (हिं.स.) - पासपोर्ट सेवा केंद्र झीरो वन, सर्वे क्रमांक 79/1, घोरपड़ी-मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड समोर, मुंढवा, पुणे – 411036 या ठिकाणाहून आता मोंटक्लेयर बिल्डिंग, सर्वे क्र. 134/1, पार्ट एमपी-1, कमर्शियल पहिला मजला कार्यालय क्र. 101 आणि 102, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे – 411021 येथे दिनांक 30.03.2026 (सोमवार) पासून स्थलांतरित होत आहे.
पासपोर्ट सेवा केंद्र, पुणे दिनांक 30.03.2026 पासून नवीन ठिकाणावरून आपले कामकाज सुरू करेल.
ज्या अर्जदारांनी, मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्रात दिनांक 30.03.2026 (सोमवार) रोजी किंवा त्यानंतर अपॉइंटमेंट घेतलेली आहे; त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपले अर्ज घेऊन निर्धारित तारीख व निर्धारित वेळेनुसार पासपोर्ट सेवा केंद्र, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण येथे भेट द्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी