उदगीरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, ११ जणांवर गुन्हा
लातूर, 23 मार्च (हिं.स.)।लातूर जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीर जुगार व्यवसायाविरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उदगीर तालुक्यातील मन्ना (उमरगा) शिवारात मोठी कारवाई करत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
जुगार अड्ड्यावर छापा


लातूर, 23 मार्च (हिं.स.)।लातूर जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीर जुगार व्यवसायाविरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उदगीर तालुक्यातील मन्ना (उमरगा) शिवारात मोठी कारवाई करत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २३ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन वाढवणा (बु) येथील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मन्ना शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळ काही इसम “तिर्रट” नावाचा जुगार खेळत आहेत. माहितीची खात्री करून पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपी पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून ५ आरोपी फरार आहेत.

अटक आरोपी :

संभाजी दिगांबर पाटील (डाऊळ)

शिवकांत विश्वनाथ मिरजगावे (खेर्डा)

शिवकुमार राजेंद्र शेळके (टाकळी)

लईकोद्दीन शाहबुदीन चौधरी (उदगीर)

विलास दशरथ दहीकांबळे (हाळी)

ज्ञानेश्वर नरसिंग सारोळे (निडेबन)

फरार आरोपी : अजित राठोड

बालाप्रसाद उर्फ प्रविण गिल्डा

गोविंद चव्हाण

पवन गिल्डा

ऋषिकेश वाघमारे

कारवाईदरम्यान जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम २१,५०० रुपये तसेच घटनास्थळी आढळलेली १० चारचाकी व दुचाकी वाहने (अंदाजे किंमत २३.२० लाख रुपये) असा एकूण २३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बळदे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande