
लातूर, 23 मार्च (हिं.स.)।
क्षयरोग (टीबी) उच्चाटनासाठी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी दिली.
24 मार्च – जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सकाळी 7 वाजता भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टाऊन हॉल येथून सुरू होऊन गांधी चौक, गंजगोलाई, सराफ लाईन मार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे समारोप होणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत “टीबी मुक्त भारत” अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis