राम आणि कृष्ण दैवत नाही तर भारताची अस्मिता आहे -जितेंद्र तरटे
नाशिक, 23 मार्च (हिं.स.)। ‘राम’ आणि ‘कृष्ण’ ही केवळ दैवते नाहीत तर भारतीय परंपरेतील ती अस्मिता आहे.शेकडो वर्षांच्या कालखंडात अनेक स्थित्यंतरे येत गेली. परचक्र आले, सत्ताबदल झाले परंतू संतांना इथल्या मनामनात पेरलेला राम हा अखंड राहीला.कृत्रिम बुद्
Ram and Krishna are not


नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।

‘राम’ आणि ‘कृष्ण’ ही केवळ दैवते नाहीत तर भारतीय परंपरेतील ती अस्मिता आहे.शेकडो वर्षांच्या कालखंडात अनेक स्थित्यंतरे येत गेली. परचक्र आले, सत्ताबदल झाले परंतू संतांना इथल्या मनामनात पेरलेला राम हा अखंड राहीला.कृत्रिम बुद्धीमत्ता आणि विज्ञानयुगाच्या कालखंडात विश्व वेगाने बदलते आहे. भौतिक गोष्टी आता सहजगत्या प्रत्येकाच्या हाती येत असताना कुटुंबव्यवस्था अन् समाजव्यवस्थेतील मुल्यांची घडी विस्कटते आहे. संतांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे शिंपण नवीन पिढ्यांपर्यंत केले गेले तर ही मूल्यव्यवस्था जगेल.आपण का जगावं ? याचा बोधही हीच मूल्यव्यवस्था जगाला देईल, यासाठी संतांचे तत्वज्ञान अभ्यासण्याची गरज ‘एआय’ च्या उंबरठ्यावर आहे , असा संदेश वरिष्ठ पत्रकार व संत वाड्:मय-लोकसंस्कृतीचे अभ्यासक जितेंद्र तरटे यांनी दिला.

सोमवारी झालेल्या वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त

श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे त्यांनी सोमवारी ' संत रचनेतील राम याविषयावर ते बोलत होते.

तरटे पुढे म्हणाले, अतिप्राचीन कालखंडातील गहन, रुक्ष वेदांताची मांडणी पुढील पिढ्यांमध्ये अनेक संप्रदायांनी सुकर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण भारतवर्षामध्ये भारतीय संस्कृतीचा कणा असणाऱ्या ‘राम’ आणि ‘कृष्ण’ या देवप्रतिमांनी दिलेल्या मुल्यांची मांडणी तळागाळापर्यंत झाली. येथील मनामनात ‘राम’ रुजल्यामुळे परकीय आक्रमकांनी बाह्य सत्ता करण्यात यश मिळविले असले तरीही इथल्या मातीपासून, इथल्या प्रतिकांपासून आणि या संस्कृतीपासून इथल्या माणसाला तोडण्यास आजवर कुणीही यशस्वी झाले नाही.

विषयावर विवेचन करताना त्यांनी पुढे सांगितले, संतांनी केवळ दाशरथी रामाची मांडणी जनमाणसात केली नाही. तर , रामतत्वाचे निर्गूण स्वरुप, द्वैत-अद्वैत तत्वज्ञान, सगुण-निर्गुण संकल्पना आणि परचक्र भेदताना जशास तसे प्रत्युत्तर देणारा कोदंडधारी राम, अशी रामाची अनंत रुपे मांडून रामचरित्राच्या सुत्राद्वारे समाजाचे धारिष्ठ्य विपरित काळातही टिकवून ठेवले. विषयाची संकल्पना मांडताना वक्त्यांनी संत कबीर, संत रामानंद, संत तुलसीदास, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोंदवलेकर महाराज यांसह विविध संतांच्या रचनांचा अन्वयार्थ रसाळपणे मांडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande