
बीड, 23 मार्च (हिं.स.)।
वारकरी संप्रदायात संत बंकटस्वामी महाराज यांचे संपादकीय कार्य मोठे आहे. स्वामी महाराज हे गुणवंताची खाण होते. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे विस्तारलेले स्वरूप पाहायला मिळते, असे प्रतिपादन महंत तुकाराम महाराज भारती यांनी केले. बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत सुदाम देव महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ते बोलत होते.
'ज्ञानदेव' या नावाचा उच्चार करताच मनातील सर्व माया अज्ञान आणि सांसारिक मोह मुळासकट नष्ट होते. संतांचा महिमा शब्दांत सांगणे कठीण आहे. जेव्हा गर्विष्ठ चांगदेवांनी वाघावर बसून दर्शन घ्यायला आले, तेव्हा माऊलींनी त्यांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी एका 'निर्जीव भितीला' सजीव करून चालवून दाखवले. हा त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा चमत्कार होता. ज्या सामान्य आणि अज्ञानी जड-मूढ लोकांना समाजाने नाकारले होते, त्यांचा माऊलींनी उद्धार केला. अशा महान आणि करुणामयी ज्ञानेश्वर माऊलींना संत नामदेव महाराज वारंवार नमस्कार करतात. अशी चिंतन मांडले तसेच अनेक उदाहरणे आणि दृष्टांत देऊन संतांचा महिमा काय आहे हे पटवून दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis