
मुंबई, 23 मार्च (हिं.स.) - मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी ८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१. लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01021 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता निघेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. (०१ फेरी)
ट्रेन क्रमांक 01022 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी नागपूर येथून २०.०० वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (०१ फेरी)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी (ट्रेन क्रमांक 01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर व्हॅन.
२. पुणे–नागपूर–पुणे विशेष (२ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01467 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी पुणे येथून १५.५० वाजता निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (०१ फेरी)
ट्रेन क्रमांक 01468 ही विशेष गाडी दिनांक ०४.०४.२०२६ (शनिवार) रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. (०१ फेरी)
थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर व्हॅन.
३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगांव–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ आणि ०५.०४.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता निघेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (०२ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ आणि ०५.०४.२०२६ रोजी मडगांव येथून १६.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (०२ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.
संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: विशेष रेल्वे गाड्या क्रमांक 01021/22, 01467/68 आणि 01129 साठीचे आरक्षण दिनांक २४.०३.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी