छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार
छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। अयोध्येतील श्रीराममंदिराच्या धर्तीवर शहरातही भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून, रामभक्तांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. बीड बायपास परिसरात उभारण्यात येणारे हे मंदिर अयोध्येतील मंदिराच
छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार


छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। अयोध्येतील श्रीराममंदिराच्या धर्तीवर शहरातही भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून, रामभक्तांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. बीड बायपास परिसरात उभारण्यात येणारे हे मंदिर अयोध्येतील मंदिराची छोटी पण हुबेहूब प्रतिकृती असणार आहे.

डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने श्रीराम इन्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दमाणी वैद्यकीय महाविद्यालय परिसर. बीड बायपासजवळ, मूर्तिजापूर परिसर येथे मंदिर उभारले जाणार आहे. एकूण प्रकल्प क्षेत्र सुमारे ३५ एकर आहे. मंदिरासाठी राखीव जागा : सुमारे १ एकर अंदाजे मंदिर बांधकाम क्षेत्र : २५,००० ते ३०,००० चौरस फूट बांधकाम कालावधी : अंदाजे ३ ते ४ वर्षे बांधकाम साहित्य : राजस्थानमधील मकराना मार्बल वास्तुशैली : पारंपरिक नागर शैली डिझाईन अयोध्येतील मंदिराचे प्रमुख वास्तुकार आशिष सोमपुरा यांच्याकडून खांब व नक्षीकाम : अयोध्येतील मंदिरासारखेच सूक्ष्म कोरीव काम विशेष वैशिष्ट्य : भाविकांना अयोध्येतील मंदिरासमोर उभे असल्याचा अनुभव देणारी रचना.

डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या बीड बायपास येथील नवीन वास्तू उभारली जात आहे. या ठिकाणी अयोध्या येत्या २६ मार्च रोजी रामनवमीला या मंदिरात पूजा आणि शिलान्यास समारंभ होईल. सकाळी ९.३० वाजता आयोजित या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, कोअर कमिटीचे अध्यक्ष अशोक गोयल, नरेश सराफ यांनी केले आहे. या मंदिरासाठी विशेष शिळा शहरात आल्या आहेत. त्यातील एका शिळेचे सायंकाळी हेडगेवार रुग्णालयात धन्वंतरी देवतेच्यासमोर विधिवत पूजन करण्यात आले. मंदिराची प्रतिकृती असणारे मंदिर बांधले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande