नांदेड - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव यांच्या विद्यमाने बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव यांच्य
नांदेड - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव यांच्या विद्यमाने बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव यांच्या विद्यमाने बुधवारी (ता. २५) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हदगाव येथील वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय आयटीआयमध्ये सकाळी दहापासून हा मेळावा होणार असून, विविध खासगी

आस्थापनांकडून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड) व सतीष जिददेवाड (मो. ७०३८८७५५४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande