
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) । मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपियन खंडातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL) आणि आयओसीएल (IOCL) या तिन्ही कंपन्यांच्या एल.पी.जी. गॅस सिलेंडर वितरकांची बैठक घेऊन साठा व वितरण याचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्ह्यामध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना बुकिंगनंतर लवकरात लवकर 'फर्स्ट इन फर्स्ट आउट' (FIFO) पद्धतीने सिलेंडर मिळेल. गॅस एजन्सीवर गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टीम लागू करण्याबाबत तसेच बुकिंगनंतर ८ दिवसांत ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्यास संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ऑईल कंपन्या मिळून जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी कटिबद्ध आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले गेले आहे.
सिलेंडरच्या वितरणात काही अडचणी आल्यास संबंधित तालुकानिहाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्हा हेल्पलाईन क्रमांक ७२१९१११४२४ असून, तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
अमरावती शहर: प्रविण राऊत (९६७३१६१९७५)
मोर्शी: सागर बगाडे (८६००८५६४३१)
नांदगाव खंडेश्वर: शीतल राठोड (९४२१८६९९९५)
वरुड: निखील नलावडे (९८२२५०८४०३)
अंजनगाव सुर्जी: रणजीत रामाघरे (९५११७१५१९२)
तिवसा व अमरावती ग्रामीण: शीतल आंबटकर (९०११३४१२८७)
भातकुली: मोनाली भोवरे (९५५२८७१५७२)
धामणगाव रेल्वे: प्रवीण भागवत (७०३८६०६३८५)
अचलपूर: राहुल केदारे (९६६५७४४८४९)
चांदुर रेल्वे: विश्वनाथ पखाले (९६७३५६१९६४)
धारणी: रमेश वाढवे (९४०३५३२१९०)
चिखलदरा: गणेश इंगळे (७५०७९५३५५५)
दर्यापूर: वैभव महाजन (९४०४२०७६०२)
चांदूर बाजार: जितेंद्र पाटील (९३५६७४२५२८)
जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी नागरिकांना या सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी