
बीड, 24 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील मौजे वाहेगाव आम्ला येथे संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून बीड येथील भागवताचार्य सचिन महाराज सपकाळ यांच्या अमृततुल्य वाणीतून ही भागवत कथा श्रवण करण्यास मिळणार आहे.
कथेची सांगता दि.३० मार्च सोमवार रोजी होणार आहे. कथेची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. या भागवत कथेस माऊली महाराज घुमरे - सिंथ-गायन, मातोश्री कुसुमताई सपकाळ - गायन, जगन्नाथ महाराज कराळे-तबला यांची सुंदर संगीत साथ लाभणार आहे. येत्या .३० मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत वाल्मिकेश्वर महादेवाची पालखी मिरवणूक व त्या नंतर श्रीमद् भागवत ग्रंथ मिरवणूक निघणार आहे. सर्व भाविक भाविक भक्तांनी भागवताचार्य सचिन महाराज सपकाळ यांच्या मधूर भक्तीपुर्ण वाणीतून भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis