शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी, 24 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी टीबीसी) लघुलेखन परीक्षेत जानेवारी २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत ऑनलाई
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


परभणी, 24 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी टीबीसी) लघुलेखन परीक्षेत जानेवारी २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल दि. १० मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ‘अमृत’ योजनेच्या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ब्राम्हण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, राजपूत, यलमार अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, गुजराथी, ठाकूर, जाट, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी घटकांचा यात समावेश आहे.

परीक्षाशुल्क प्रतिपूर्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिल २०२६ असून, अर्ज अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahaamrut.org.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्जासोबत सन २०२५-२६ किंवा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू असलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व अथवा अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटातील जात नमूद असलेला पुरावा (टी.सी., एल.सी., शालेय निर्गम उतारा इ.), जानेवारी २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तसेच बँक खात्याचा तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश याची स्पष्ट प्रत) सादर करणे आवश्यक आहे. असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande