कौंडण्यपूर येथे चैत्र रामनवमी, देवी नवरात्र महोत्सवाची सुरवात
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री अंबिका देवी संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र रामनवमी देवी नवरात्र महोत्सवाला सुरवात झाली आहे. हा महोत्सव २६ मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमां
कौंडण्यपुरात चैत्र रामनवमी देवी नवरात्र महोत्सव


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री अंबिका देवी संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र रामनवमी देवी नवरात्र महोत्सवाला सुरवात झाली आहे. हा महोत्सव २६ मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे.

दैनिक कार्यक्रमांमध्ये देवी सहस्त्रनाम, महापूजा आरती, दुर्गा शप्तशती, धूप आरती, नवैध, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ तसेच दैनिक भजनांचा समावेश आहे. महोत्सवाच्या निमित्ताने श्री मनोकामना सिद्धी अखंड दीपज्योत तसेच श्रीराम कथा प्रवचन ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कथा वाचक सुधाकर महाराज ठाकरे व संघ सहभागी राहणार आहेत.

विशेष कार्यक्रमांमध्ये २३ मार्चला श्री गुरुदेव सेवा भजनमंडळाचे भजन, २४ मार्चला जीवन विकास भजन मंडळाचे भजन आयोजित आहेत. २६ मार्चला महाप्रसाद वाटप आणि दुपारी चार वाजता ज्योत विसर्जन कार्यक्रम होणार आहे.

संस्थानाचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी भाविक भक्तांना चैत्र रामनवमी देवी नवरात्र महोत्सवातील मनोकामना सिद्धी अखंड दीपज्योत, श्रीराम कथा प्रवचन व ज्ञानयज्ञ यांसारख्या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande