अमरावती- आयुक्तांकडून मसानगंज येथील उच्च प्राथमिक हिंदी शाळेची पाहणी
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज महानगरपालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्र.२, मसानगंज येथे शाळेची जुनी इमारत आणि परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. पाहणीदरम्यान निदर्शनास आले की शाळेची इमारत अनेक
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची उच्च प्राथमिक शाळा क्र.२, मसानगंज येथे पाहणी


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज महानगरपालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्र.२, मसानगंज येथे शाळेची जुनी इमारत आणि परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. पाहणीदरम्यान निदर्शनास आले की शाळेची इमारत अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत असून काही ठिकाणी मोडकळीस आलेली आहे. ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोकादायक आहे. तसेच या कारणास्तव शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेनुसार वाढत नसल्याचे आढळले. आयुक्तांनी या परिस्थितीवर त्वरित लक्ष देण्यासाठी शाळेचे बिल्डिंग ऑडिट करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिकेचे अभियंता लक्ष्मण पावडे यांना दिले. या अहवालानंतर शाळेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तो योग्य तो उपाय लवकरात लवकर राबवण्याचे निर्देश देखील देण्यात आले. याचबरोबर, आयुक्तांनी शाळेच्या आवारातील आणि परिसरातील स्वच्छतेची देखील सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळले की शाळेच्या आवारात कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. यावर त्वरित कारवाईसाठी आयुक्तांनी मसानगंज स्वच्छता निरीक्षक शेख यांना शाळेच्या आवारात कचरा टाकू नये असे कडक आदेश दिले. तसेच शाळेच्या आवारात कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी वॉल-कंपाऊंड तयार करून कचरा व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या भेटीवेळी मसानगंज नवनिर्वाचित नगरसेवक दिपक साहू व शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम उपस्थित होते. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शाळेच्या सुरक्षिततेसाठी, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी व परिसरातील स्वच्छतेसाठी तातडीने आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांनी परिसरातील लोकांनाही शाळेच्या परिसरात स्वच्छता राखण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले असून, शाळा व परिसर सुरक्षित, स्वच्छ व विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण प्रदान करण्यासाठी महानगरपालिकेचे पूर्ण लक्ष राहील असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande