परभणी - देवनांद्रा जि.प. शाळेचा ‘वर्ड चॅम्पियन’ स्पर्धेत दबदबा; दोन विद्यार्थ्यांचा तालुक्यात प्रथम क्रमांक
परभणी, 24 मार्च (हिं.स.)।जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ड चॅम्पियन’ स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा देवनांद्रा (सा.का.प), ता. पाथरी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुकास्तरावर आपला ठसा उमटवला
अ


परभणी, 24 मार्च (हिं.स.)।जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ड चॅम्पियन’ स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा देवनांद्रा (सा.का.प), ता. पाथरी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुकास्तरावर आपला ठसा उमटवला आहे.

शब्द अंकुर गट (इयत्ता ३री ते ५वी) या गटातून अर्णव विनोद जुकटे व आदित्य बाबुराव गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे शाळेचा तसेच परिसराचा गौरव वाढला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशामागे मार्गदर्शक शिक्षक पोपळघट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक महिपाल तसेच प्रभारी मुख्याध्यापक भागवत यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत स्पर्धेसाठी सक्षम तयारी करून घेतली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राठोड व केंद्रप्रमुख सानप यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशामुळे देवनांद्रा येथील जि.प. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande