
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : परभणी येथील शारदा महाविद्यालयाच्या नॉलेज रिसर्च सेंटरचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत मेने यांच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता एक आधुनिक दृष्टिकोन’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी हजेरी लावली. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे आणि प्रा. डॉ. सुनील बल्लाळ उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, माणसाच्या जीवनात वाचनाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. ग्रंथांमुळे मानवी जीवन अधिक समृद्ध होते, असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रा. डॉ. प्रशांत मेने यांचा हा चौथा ग्रंथ असून त्यांच्या या यशाबद्दल प्रा. डॉ. नितीन बावळे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. गजानन मरगीळ, डॉ. नवनाथ सिंगापूरे, प्रा. डॉ. सचिन खडके, सुरेश जयपूरकर, प्रकाश काळे, विश्वनाथ खेडकर, डॉ. श्रीधर पांढरकर आणि राजाराम मुत्रटकर यांनी अभिनंदन केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis