बीड जिल्ह्यासाठी १.२० लाख लिटर रॉकेल मंजूर; ५ लाख रेशनधारकांना दिलासा
बीड, २४ मार्च (हिं.स.) : देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईवर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यासाठी १.२० लाख लिटर रॉकेल (केरोसिन) साठा मंजूर करण्यात आला आहे. हा साठा जिल्ह्यातील १९७७ स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप केला जाणा
बीड जिल्ह्यासाठी १.२० लाख लिटर रॉकेल मंजूर; ५ लाख रेशनधारकांना दिलासा


बीड, २४ मार्च (हिं.स.) : देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईवर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यासाठी १.२० लाख लिटर रॉकेल (केरोसिन) साठा मंजूर करण्यात आला आहे. हा साठा जिल्ह्यातील १९७७ स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप केला जाणार आहे, ज्यामुळे सुमारे ५ लाख रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील ९ वर्षांपासून बंद असलेले रॉकेल वितरण पुन्हा सुरू झाल्यामुळे नागरिकांना आता गॅस सिलिंडरसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार नाही. रॉकेल वितरणाची नेमकी प्रक्रिया, दर आणि अतिरिक्त साठा याविषयी आज सोमवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

गॅस बुकिंगचा कालावधी गेल्या काळात ४५ दिवसांपर्यंत वाढल्याने ग्रामीण भागात चुली पेटण्यास अडचण येत होती, मात्र आता रॉकेल उपलब्ध झाल्याने ही अडचण दूर होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या परवानाधारकांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत. शासन स्तरावर युद्धपातळीवर सर्व आवश्यक हालचाली सुरू असल्याचेही सांगितले आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande