
परभणी, 24 मार्च (हिं.स.)। जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विकास कामांना गती द्या असे मुख्यमंत्र्यांद्वारे आवाहन क रण्यात आहे ग्रामीण भागातील विकास कामांना गती दिली पाहिजे, पायाभूत सुविधा, नागरीकांच्या मूलभूत सोयी-सुविधा यांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा लता विजय वाकळे, गटनेते दिलीपराव देशमुख यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, संजय वाकळे व अन्य मंडळींनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नूतन अध्यक्ष वाकळे यांच्यसह अन्य पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व ग्रामीण विकासाच्या कामांना सर्वतोपरि मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis