गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांसाठी हरभरा खरेदी योजना सुरु
बीड, २४ मार्च (हिं.स.) : गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गेवराई तालुका खरेदी-विक्री संघ (NAFED अंतर्गत) ने हरभरा खरेदी योजना २०२५-२०२६ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत हरभरा या पिकाची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन न
गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांसाठी हरभरा खरेदी योजना सुरु


बीड, २४ मार्च (हिं.स.) : गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गेवराई तालुका खरेदी-विक्री संघ (NAFED अंतर्गत) ने हरभरा खरेदी योजना २०२५-२०२६ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत हरभरा या पिकाची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया खरेदी-विक्री संघाचे कार्यालय, गेवराई येथे सुरू झाली असून नोंदणीची अंतिम तारीख ३० मार्च २०२५ आहे. सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन संघाचे सभापती जयदिप औटी यांनी हरभरा खरेदी शुभारंभ प्रकरणी केले.

उपस्थित कार्यक्रमात मार्केट कमेटी सचीव शिवाजी हक्कदार, सचीव एम. आर. गरड, ऑपरेटर काटकर, दत्ता औटी तसेच शेतकरी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाने ही योजना मंजूर केली असून, गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या खरेदी केंद्रावर हरभरा प्रतिकिं टन ५८७५ रुपये या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे:

७/१२ व ८ अ उतारा (ई-पिक पाहणीसह)

आधारकार्ड

बँक पासबुक (चालू खाते)

जनधन खाते मान्य नाही

शेतकऱ्याचे नाव सातबारावर असणे आवश्यक

शेतकऱ्याने स्वतः कागदपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande