छ. संभाजीनगर : नागसेन फेस्टिव्हल दशकपूर्ती महोत्सव रविवारपासून
छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च (हिं.स.) : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या काही आजी-माजी विद्यार्थ्यांनी १२५ व्या भीमजयंतीनिमित्त सुरू केलेला नागसेन फेस्टिव्हल यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दशकपूर्तीच्या निमित्ताने हा महोत्सव २९, ३० व ३१ मार्च रोजी
छ. संभाजीनगर : नागसेन फेस्टिव्हल दशकपूर्ती महोत्सव रविवारपासून


छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च (हिं.स.) : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या काही आजी-माजी विद्यार्थ्यांनी १२५ व्या भीमजयंतीनिमित्त सुरू केलेला नागसेन फेस्टिव्हल यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दशकपूर्तीच्या निमित्ताने हा महोत्सव २९, ३० व ३१ मार्च रोजी नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय येथे दररोज संध्याकाळी ६ ते १० या वेळेत आयोजित केला आहे.

फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी (दि. २९) कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चेतन कुमार (अहिंसा) यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश ‘बहुजनांच्या शैक्षणिक नाकेबंदीचे राष्ट्रीय षडयंत्र’ या विषयावर व्याख्यान देतील, तर व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव उपस्थित राहणार आहेत.

तिन्ही दिवसांत महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भेदभावाच्या विरोधात ‘रोहित अॅक्ट’ अंतर्गत कडक कायदा करण्याची मागणी, तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाची शिफारस रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. संकलित स्वाक्षऱ्यांचे निवेदन शासनाकडे पाठवण्यात येईल.

आगामी ३० मार्च रोजी ‘आडवी आर्ट’च्या वतीने ‘पाराई’ वाद्य प्रदर्शन केले जाईल, जे दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये दलितांच्या सामाजिक समता आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर युवा पत्रकारांचा ‘नव माध्यमातील आंबेडकरी पत्रकारितेचे वर्तमान आणि भविष्य’ विषयक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

फेस्टिव्हलच्या समारोप प्रसंगी ३१ मार्च रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेजवाडा विल्सन ‘तंत्रज्ञानाचा बुरखा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा चेहरा भारताचं जात वास्तव’ या विषयावर भाष्य करतील.

या सत्राचे अध्यक्ष सिने अभिनेते मिलिंद शिंदे असणार आहेत.

महोत्सवाच्या विशेष सांस्कृतिक सत्रात प्रांजल सुरडकर, रिदम रिव्होल्यूशन संघाचा फ्लॅश मॉब, विपीन तातड आणि टीम यांचे रॅप सादरीकरण होईल. तसेच व्हीआयपी श्रावस्ती आणि हरीश कांबळे रॅप करणार, तर बाल कलाकार अरहं वाळके भीमगीत सादर करणार आहे.

नागसेन फेस्टिव्हल हा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जागरूकता वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण मंच मानला जात आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande