
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : भारतात हिंदु धर्म, संस्कृतीच्या ऐक्यतेसाठी आपल्या मूळ हिंदू संतच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तोच मानवतेच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे. ते श्रीमद्भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीत आढळून येतो. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुकाराम गरुड ठाकुर बुवा यांनी परभणीतील लोकमान्य नगरमध्ये झालेल्या हिंदू विराट महासंमेलनात व्याख्याते म्हणून केले.
यावेळी वक्ते तथा संघाचे प्रांत प्रचारक स्वप्नील चामणीकर यांच्यासह संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र मुंडे, हभप विलास लिंबेकर, हभप झाडे महाराज, श्रीराम जी तिवारी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
हे महासंमेलन शहरातील लोकमान्य नगरमध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात झाले. याप्रसंगी लोकमान्य नगरसह परिसरातील हजारो नागरिक एकत्रित झाले होते.
याप्रसंगी पुढे बोलताना गरुड ठाकुर बुवा म्हणाले की, या महासंमेलनाचा हेतू समस्त हिंदू एकता व्हावी असा आहे. याबाबत आपल्या संतांनी अध्यात्माच्या दृष्टीने फार महत्वाची भूमिका मांडली आहे. ती मानवतेच्या दृष्टीने ही महत्वाची वाटते. हिंदू धर्म संस्कृती म्हणून कशी टिकली व संवर्धतीत झाली पाहिजे त्याबाबत श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात देखिल बोध सांगितला आहे. आजचा समाज जो अनेक भेदांनी ग्रस्त झाला आहे, त्यांना एकतेचा संदेश गीता देते. गीता आणि ज्ञानेश्वरीत जसा द्वैत अद्वैत ची एकता सांगताना जो समन्वय दाखवला त्याच विचारांची मांडणी सर्व हिंदूच्या एकतेसाठी उपयुक्त आहे. एकतेसाठी एक अधिष्ठान महत्वाचे असते. सकल हिंदू राष्ट्र म्हणून एक आहेत हे आपल्या समाजाचे एक अधिष्ठान ठेवले तर आपल्या समाजातील पंथ, संप्रदाय, जाती वर्ण हे भेद दूर होतील व एकता साधेल.
ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ओवीत ओम् नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या यात सर्व मनुष्याच्या जगाच्या उत्पत्तीचे मूळ तत्त्व, तो एक परमेश्वर आहे. त्यांची रुप वेगवेगळी दिसत असली तरी अंतीमत: तो परब्रह्म परमेश्वर एक आहे. जीवन जगण्यासाठी हे एक मूळ तत्व अधिष्ठान ठेवले तर सर्व समाजाची सहज एकता होईल असे वाटते.
यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत प्रचारक स्वप्नील चामणीकर यांनी आपले मनोगत याठिकाणी मांडले. ते म्हणाले की , जगातील अनेक धर्म, संस्कृती व राष्ट्र परकीय आक्रमणापासून स्वतःला वाचवू शकले नाही, ते काळाच्या ओघात नष्ट झाले. मात्र आमची प्राचीन हिंदु धर्म व संस्कृती मागील हजारो वर्षांपासून टिकून आहोत. आम्ही हिंदू म्हणून एक आहोत, आपले पूर्वज एक आहेत, ही हिंदू भूमी आहे ती टिकवाचे असेल तर आपले राष्ट्र सर्वप्रथम हे तत्त्व आपण मनात जपले पाहिजे. ज्यासाठी आज जगात इस्त्रायल राष्ट्र हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. तेच मूलतत्व आपण ' हिंदू आणि हिंदुत्व ' या रुपाने जपले पाहिजे. हिंदू जीवनपध्दतीचे संरक्षण व संवर्धनासाठी हिंदु एकतेची गरज आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis