परभणीत जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील विविध भागांत मूक जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनसुर्य सामाजिक कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने क्रांती नगर व रामकृष्ण नगर परिसरात जनावरांसाठी पिण्याच्य
परभणीत जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा


परभणी, 24 मार्च (हिं.स.) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील विविध भागांत मूक जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनसुर्य सामाजिक कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने क्रांती नगर व रामकृष्ण नगर परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रतिष्ठानतर्फे संबंधित ठिकाणी पाण्याचे हौद उभारून त्यामध्ये नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील जनावरांना मोठा दिलासा मिळत असून, स्थानिक नागरिकांकडून या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.मूक प्राण्यांची सेवा ही केवळ करुणा नसून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित कनकदंडे यांनी केले.

यावेळी उपाध्यक्ष दीपक कासांडे, सचिव विशाल जोशी तसेच नागेश नरळदकर, कृष्णा कनकदंडे, शाम थोरात, वल्लभ देशमुख, मंदार कातनेश्वरकर, आनंद रामपुरकर, शंतनू नवघरे, कानडे सर, देशपांडे सर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सामाजिक कार्याला चालना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande