‘अमृत मित्र’ उपक्रमात परभणीच्या महिला बचत गटांची राष्ट्रीय स्तरावर छाप
परभणी, 24 मार्च (हिं.स.) । महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘अमृत 2.0’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत मित्र’ उपक्रमात परभणीतील महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ठळक छाप उमटवली आहे. दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष सोह
अ


परभणी, 24 मार्च (हिं.स.) । महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘अमृत 2.0’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत मित्र’ उपक्रमात परभणीतील महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ठळक छाप उमटवली आहे. दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष सोहळ्यात शहरातील 29 महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून परभणीचा गौरव वाढवला.

या उपक्रमासाठी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख तसेच आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अमृत मित्र’ कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष मस्के, पठाण इफ्तियार, अर्जुन झटे, कुशवर्ती जंगले, रेखा तपसे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे परभणीतील 29 महिलांना विविध राज्यांतील बचत गटांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या यशस्वी उपक्रमांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.

उद्यान देखभाल व स्वच्छतेचे काम करणाऱ्या या महिलांना आपला व्यवसाय अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित करण्याबाबत मार्गदर्शन मिळाले. भारत मंडपमसारख्या जागतिक दर्जाच्या ठिकाणी झालेल्या सन्मानामुळे महिलांचा आत्मविश्वासही वाढला आहे.

या उपक्रमासाठी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, शहर प्रकल्प अधिकारी सुभाष मस्के तसेच शहर अभियान व्यवस्थापक यांनी विशेष प्रयत्न करून महिलांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

महिला सक्षमीकरणावर भर

अमृत 2.0 अभियानांतर्गत पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि सभागृह नेते सय्यद ऊर्फ माजू लाला यांनी सांगितले. दिल्लीतील या सन्मानामुळे इतर बचत गटांनाही प्रेरणा मिळेल आणि महिला अधिक उत्साहाने शहर स्वच्छतेच्या कामात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande