छ.संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील ७ सदस्य व ३ थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पिंपरखेडा टाकळी कदीम, दिघी, खडकनारळा, नंद्राबाद, पुरी या ठिकाणी एकूण दहा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्
छ.संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील ७ सदस्य व ३ थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

पिंपरखेडा टाकळी कदीम, दिघी, खडकनारळा, नंद्राबाद, पुरी या ठिकाणी एकूण दहा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये पिपरखेडा येथील प्रभाग २ मधील स.सा. स्त्री. व अ. जमाती प्रत्येकी एक जागा तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये ना. मा. प्र. स्त्री. एक जागा, टाकळी कदीम येथील प्रभाग १ व प्रभाग ३ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातून थेट सरपंचाची निवड होईल. दिघी येथील सरपंचाने राजीनामा दिल्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदासाठी निवडणूक होईल.

खडक नारळा येथील रिक्त झालेल्या जागेसाठी, नंद्राबादमधून प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक जागा तर पुरीमध्ये प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जातीसाठी एका जागेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

नोटीस प्रसिद्धी ३० मार्च, नामनिर्देशन पत्र व सादर शनिवार व रविवार वगळून राहील. १५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी. १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस असेल. दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २९ एप्रिल रोजी निकाल घोषित केला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande