बीड जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी 'कृषी अवजार बँका' स्थापनेसाठी अनुदान
बीड, २४ मार्च (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांना शेती व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत ''कृषी अवजार बँका'' स्थापन करण्यासाठी २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात
बीड जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी 'कृषी अवजार बँका' स्थापनेसाठी अनुदान


बीड, २४ मार्च (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांना शेती व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत 'कृषी अवजार बँका' स्थापन करण्यासाठी २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी सांगितले की, या योजनेसाठी पात्र गटांना प्रकल्पाच्या एकूण मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य मिळणार आहे. उमेद, माविम किंवा आत्मा पुरस्कृत महिला बचत गटांना ५ एप्रिलपर्यंत पोकराच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.

योजनेत सहभागी होणाऱ्या गटात वेगवेगळ्या कुटुंबांतील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. एका गावातून केवळ एकाच महिला गटाची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.

अनुदानातून ट्रॅक्टर, पेरणी व कापणी यंत्रे, कम्बाइन हार्वेस्टर यांसारखी आधुनिक कृषी अवजारे खरेदी करता येतील. तसेच ज्या प्रकल्पांचे मूल्य २० लाखांपेक्षा जास्त असेल, त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील.

प्रशासनाकडून महिलांना आत्मनिर्भर होण्याच्या या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande