श्रीक्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहासाठी उमापूर नगरी सज्ज दि ३१ मार्चला शोभायात्रेत ध्वज पथक, जिवंत देखावा
बीड, 24 मार्च (हिं.स.)।श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचा ७४ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या हस्ते उमापूर ता. गेवराई जि. बीड या ठिकाणी ३१ मार्च रोजी आरंभ होत आहे. या सप्ताहासाठी उमापूर वासियांकडून जय्यत तयारी सुरू आ
श्रीक्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहासाठी उमापूर नगरी सज्ज दि ३१ मार्चला शोभायात्रेत ध्वज पथक, जिवंत देखावा


बीड, 24 मार्च (हिं.स.)।श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचा ७४ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या हस्ते उमापूर ता. गेवराई जि. बीड या ठिकाणी ३१ मार्च रोजी आरंभ होत आहे. या सप्ताहासाठी उमापूर वासियांकडून जय्यत तयारी सुरू आहे.५५ एकर क्षेत्रामध्ये मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते मंडपला गुढी उभारण्यात आली.गावामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. दि.३१ मार्च रोजी संपूर्ण गावांमधून मोठी वैभवशाली शोभायात्राकाढण्याचे नियोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.या शोभायात्रा मध्ये डी.जे, बँड पथक, ढोल पथक, लेझीम पथक, ध्वज पथक, महापुरुषांचा जिवंत देखावा. घोड्यांचे रथ, गावामधील शाळेतील वेशभूषा केलेले बालकलाकार, पंचक्रोशीतील भजनी मंडळ टाळकरी, भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या शोभायात्रा मध्ये सहभागी होणार आहेत.

आगामी ३१ मार्च रोजी दुपारी १ ते ४ समाधान महाराज शर्मा यांच्या अमृततुल्य वाणीतून राम कथा होणार आहे. पहिले कीर्तन पुष्प शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे कर्जत यांचे तर दुसरे किर्तन पुष्प जलाल महाराजसय्यद नाशिक, तिसरे किर्तन पुष्प जयेश महाराज भाग्यवंत मुंबई, चौथे कीर्तन पुष्प विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, पाचवे कीर्तन पुष्प बाळू महाराज गिरगावकर, सहावे किर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, सातवे किर्तन पुष्प विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे जेहूर नेवासा. व काल्याचे किर्तन मंगळवार दि.७एप्रिल रोजी शिवाजी महाराज मठाधिपती श्रीक्षेत्र नारायणगड यांचे होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी या भक्तीमय सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी महाराज यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande