अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील स्मशानभूमींच्या विकासासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर
लातूर, 25 मार्च (हिं.स.)। अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील स्मशानभूमींच्या विकासासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर; मंत्री बाबासाहेब पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अहमदपूर आणि चाकू
अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील स्मशानभूमींच्या विकासासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर


लातूर, 25 मार्च (हिं.स.)। अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील स्मशानभूमींच्या विकासासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर; मंत्री बाबासाहेब पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींच्या दुरूस्ती व सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून मतदारसंघातील २५ गावांच्या स्मशानभूमींच्या कामासाठी तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच ही कामे प्रत्यक्ष सुरू होणार आहेत.

२५ गावांचा होणार कायापालट

अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची दुरवस्था झाली होती. ग्रामस्थांची ही अडचण ओळखून ना. बाबासाहेब पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या निधीतून प्रामुख्याने स्मशानभूमींची संरक्षण भिंत, शेड बांधकाम आणि सुशोभीकरण ही कामे केली जाणार आहेत. प्रत्येक गावासाठी साधारण १० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

या गावांचा समावेश:

अहमदपूर तालुका: आनंदवाडी तांडा, वळसंगी, सताळा, शिरूर ताजबंद, तेलगाव, बेंबडेवाडी, अंधोरी, काळेगाव, उमरगा कोर्ट, शिवनखेड खुर्द, कुमठा, किनगाव.

चाकूर तालुका: बनसावरगाव, कबनसांगवी, चापोली, रोहिणा, आष्टा, बोथी, शिरनाळ, अंबुलगा, नागेशवाडी, गांजुरवाडी, जानवळ, हिपळनेर, अजनसोंडा.

लवकरच कामांना मिळणार गती

मंजूर झालेल्या या निधीला लवकरच प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळून कार्यारंभ आदेश (Work Order) प्राप्त होतील. त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निधीबद्दल नामदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष आभार मानले आहेत.

शब्दाची पूर्ती: मतदारसंघाचा विकास हेच ध्येय - ना. बाबासाहेब पाटील

अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघातील स्मशानभूमींच्या विकासासाठी निधी मिळणे अत्यंत गरजेचे होते. या मूलभूत सुविधेसाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून २ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर राहील.

- ना. बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य)

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande