
तेहरान, 25 मार्च (हिं.स.)। इराणी सैन्याच्या एका प्रवक्त्याने बुधवारी अमेरिकेच्या संघर्षविरामाच्या प्रयत्नांची खिल्ली उडवत म्हटले की, अमेरिकन लोक प्रत्यक्षात स्वतःशीच चर्चा करत आहेत.
इराणी सैन्याच्या ‘खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर’चे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम जोल्फगारी यांनी हे वक्तव्य एका रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे केले, जो सरकारी दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला.ते म्हणाले, “ज्या रणनीतिक शक्तीबद्दल तुम्ही पूर्वी बोलत होता, ती आता रणनीतिक अपयशात बदलली आहे. स्वतःला जागतिक महासत्ता म्हणवणारा देश जर खरोखर सक्षम असता, तर तो आतापर्यंत या संकटातून बाहेर पडला असता. आपल्या पराभवाला कराराचे नाव देऊ नका. तुमच्या पोकळ आश्वासनांचा काळ आता संपला आहे.”
पुढे त्यांनी म्हटले, “तुमचे अंतर्गत मतभेद इतके वाढले आहेत का की आता तुम्ही स्वतःशीच चर्चा करत आहात?”ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानमार्गे इराणकडे 15 मुद्द्यांचा संघर्षविराम प्रस्ताव पाठवल्यानंतर काही वेळातच जोल्फगारी यांचे हे वक्तव्य समोर आले.
जोल्फगारी म्हणाले, “पहिल्या दिवसापासून आमचे पहिले आणि शेवटचे मत एकच आहे आणि तसेच राहील. आमच्यासारखा कोणताही व्यक्ती तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत कधीही करार करणार नाही — ना आत्ता, ना कधीही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode