इराणने पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखले
तेहरान , 25 मार्च (हिं.स.)।अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज २६वा दिवस असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने पाकिस्तानच्या कराचीकडे जाणाऱ्या एका जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखले. आयआरजीसी चे नौदल क
इराणने पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखले


तेहरान , 25 मार्च (हिं.स.)।अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज २६वा दिवस असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने पाकिस्तानच्या कराचीकडे जाणाऱ्या एका जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखले.

आयआरजीसी चे नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी म्हणाले की, 'सेलेन' नावाच्या या जहाजाला होर्मुझ पार करण्याची परवानगी नव्हती. ते म्हणाले की, या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला आधी इराणी अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल.हे सर्व प्रकरण तेव्हा घडले जेव्हा पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पझशिकयान यांच्याशी फोनवर बोलणे केले होते.

दरम्यान, युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत भारताचे ५ एलपीजी आणि तेल टँकर होर्मुझमधून गेले आहेत. यात जग वसंत, पाइन गॅस, शिवालिक, नंदा देवी आणि जग लाडकी यांचा समावेश आहे.

इराणमधील हल्ल्यांत आतापर्यंत सुमारे 1,500 लोकांचा मृत्यू, तर 18,551 जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये 8 महिन्यांच्या बाळापासून ते 88 वर्षांपर्यंतचे वृद्धांचा समावेश आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे 200 महिलांचा मृत्यू झाला. 28 फेब्रुवारी रोजी शाळेवरील हल्ल्यात 168 मुलांचा मृत्यू झाला. युद्धात 55 आरोग्य कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande