उदगीरात रोटरी क्लबच्या 'महिला शक्ती' पुरस्काराचे 29 मार्च रोजी वितरण
लातूर, 25 मार्च (हिं.स.)। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या ''महिला शक्ती'' पुरस्काराचे उदगीर येथे रविवारी दि. 29 मार्च रोजी वितरण करण्यात येणार आहे. उदगीर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय
उदगीर


लातूर, 25 मार्च (हिं.स.)। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'महिला शक्ती' पुरस्काराचे उदगीर येथे रविवारी दि. 29 मार्च रोजी वितरण करण्यात येणार आहे. उदगीर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वाविद्यालयाच्या केंद्र संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी यांना या कार्यक्रमात 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या महिला शक्ती पुरस्कारासाठी उदगीरच्या भूमिपुत्र असलेल्या पुणेस्थित उद्योजिका पल्लवी पटवारी, लातूर येथील विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्यां ऍड. बबिता संकाये, उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्यां दीपा बाहेती, उदगीर येथील विश्वा कार्गो कुरियरच्या संचालिका ललिता ठाकूर, लोहारा येथील बचत गटाच्या कार्यकर्त्या बालिका सोनटक्के, बालिका बिरादार- बेलूरे, सुनिता उदेकर यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण दि. 29 मार्च रोजी शुभंकर फंक्शन हॉल येथे सायंकाळी 05 वाजता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा संभाजीराव पाटील या राहणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा स्वाती सचिन हुडे, बिदर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. आरती रघु यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के यांच्यासह रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande