
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कला सादरीकरण विभागातर्पेâ आयोजित सुर्वण महोत्सवी नाटयमहोत्सवात दहा नाटके सादर करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादेशिक कला विभाग आयोजित सुवर्ण महोत्सवी नाट्यमहोत्सवात प्रसाद दाणी लिखित आणि विभागाचे विद्यार्थी डॉ.रवींद्र मुरकुटे दिग्दर्शित ' नथिंग टू से ' हे नाटक सादर झाले.वडील नसल्याची खंत आणि याच गोष्टीचं भांडवल करून समाजाकडून होणारी हेटाळणी सहन करणाऱ्या मुलीची घुसमट अखेर आपल्या वडिलांना शोधून काढते आणि आपली घुसमट त्यांच्यासमोर मांडते. नाटकातील मुख्य पात्र सहस्त्रबुध्दे आणि त्याची मुलगी मालविका यांच्या नात्यातील द्वंद्व हे नाटकाला गती देऊन उत्कर्षाला घेऊन जाते.काळानुरूप बदलत चाललेली कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंध यावर नाटकातून तिरकस मते मांडली आहेत.बाप आणि मुलगी यांच्या नात्याचा शोध घेणाऱ्या मुलीची व्यथा प्रस्तुत नाटकातून उत्कटतेने दाखवताना कलावंतांनी आपल्या भूमिकांना न्याय्य देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी,आजी माजी विद्यार्थी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवात सादर झालेल्या 'नथिंग टू से' या नाटकाचे दिग्दर्शन रवींद्र मुरकुटे तर लेखक प्रसाद दाणी हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis