‘अडगळीतले सूर्य’ नाटिकेतून स्त्रीशक्तीचा प्रभावी संदेश
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने साई नाट्यगृहात ‘अडगळीतले सूर्य’ या स्त्रीशक्तीवर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेतून खरे आदर्श हे सामाजिक माध्यमांवर नव्हे, तर आपल्या आसपासच दडलेले असतात, असा प्रभावी संदेश देण्
अ


परभणी, 25 मार्च (हिं.स.)। पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने साई नाट्यगृहात ‘अडगळीतले सूर्य’ या स्त्रीशक्तीवर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेतून खरे आदर्श हे सामाजिक माध्यमांवर नव्हे, तर आपल्या आसपासच दडलेले असतात, असा प्रभावी संदेश देण्यात आला.

नाट्यलेखक सुरेश झिंजुर्के लिखित तसेच ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनिल कुलकर्णी व रोहिणी कुलकर्णी यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या नाटिकेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी हे होते. उद्घाटक म्हणून वैशाली मिलिंद सावंत, प्रमुख पाहुणे नयन साईराज बोराडे तसेच नाट्य संयोजिका रोहिणी कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी सुनिता काकडे, आशा पहाडे, अनुपमा देवधर व शिला काजळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘अडगळीतले सूर्य’ या नाटिकेतून विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या भारतीय स्त्रियांच्या भूमिकांमधून हृदयस्पर्शी प्रसंग सादर करण्यात आले. या ‘अडगळीतल्या’ नव्हे, तर समाजाला उजळून टाकणार्या ‘सूर्यांना’ ओळखण्याची गरज नाटिकेतून अधोरेखित करण्यात आली. तसेच वीर मातांच्या इतिहासालाही उजाळा देण्यात आला. नाटिकेच्या सादरीकरणात नेपथ्य भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, सुनील वाकडीकर यांनी साकारले, तर संगीत, प्रकाशयोजना सार्थक कुलकर्णी, सुरेश पौळ, प्रज्वल पारवे यांनी केली. रंगभूषा व वेशभूषा हेमलता देशमुख, अनिता कुलकर्णी व गीता मुळावेकर यांनी सांभाळली.

नाटिकेत पद्मजा खारकर (आर्या), पूजा जोशी (झाशीची राणी), संज्ञा खारकर (इंदिरा गांधी), मीरा देशमुख (सावित्रीबाई फुले), सोनाली कुबरे (रमाबाई आंबेडकर), सरिता उमरीकर (बहिणाबाई चौधरी), सीमा अष्टीकर (राजमाता जिजाबाई), मंजुषा बोराडे (कल्पना चावला), रेणुका बोटे (लता मंगेशकर), सीमा काळबांडे (शाहीर) तसेच रवी कुलकर्णी व रवी मुळावेकर (चोरांच्या भूमिका) यांनी भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून हर्षदा मोगल, स्वरा देशपांडे, ऋतुजा राठोड, ईश्वरी कुलकर्णी आदींनी सहभाग नोंदवला.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande