मंत्री झिरवाळ यांना तूर्तास दिलासा : व्हिडिओची शहानिशा करून कारवाई - मुख्यमंत्री
मुंबई, 27 मार्च (हिं.स.) - मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला दूरध्वनीवरुन संपर्क केला, 3-4 व्हिडिओ जोडत चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहेत. त्यामुळे, या संदर्भात त्यांना सांगितलं आहे, तक्रार करा. व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फ
मुख्यमंत्री


मुंबई, 27 मार्च (हिं.स.) - मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला दूरध्वनीवरुन संपर्क केला, 3-4 व्हिडिओ जोडत चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहेत. त्यामुळे, या संदर्भात त्यांना सांगितलं आहे, तक्रार करा. व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळांना सांगितले. आम्ही आणि सुनेत्रा पवार त्यांच्यासंदर्भात कारवाई करू, मात्र सत्यता पडताळली जाईल. झिरवाळ यांचे व्हिडिओ गंभीर, सत्यता पडताळून पाहिली पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणावरूनही भूमिका स्पष्ट केली. पहिल्यांदा त्यांचे फोटो व्हिडिओ येतात, त्यावरुन गोष्टी निश्चित करता येणार नाही. सहभाग असेल तर कारवाई होईल, कोणालाच सोडण्याचे कारण नाही. येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे, आर्थिक फसवणूक झाली म्हणून लोकं पुढे येत आहेत. ह्या प्रकरणात दुर्दैवी महिला पीडित (व्हीक्टिम) आहेत, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर टाकले आहेत. जर कोणी व्हिडिओ अपलोड केले असतील तर कारवाई होईल. यातील गोपनीयता भंग करण्यात येत आहेत, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande