पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक
पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतात तयारीवर भर नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : ईरान, इझरायल आणि अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाचा आज 28व्या दिवशी विस्तार झाला आहे. या तीन देशांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आश
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सींगवर बैठक


पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतात तयारीवर भर

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : ईरान, इझरायल आणि अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाचा आज 28व्या दिवशी विस्तार झाला आहे. या तीन देशांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धसमान परिस्थिती निर्माण झाली असून, याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर जाणवू लागला आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे आर्थिक आणि नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीचा मुख्य उद्देश “टीम इंडिया”च्या भावनेतून समन्वय साधणे आणि परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील तयारीची समीक्षा करणे होता.बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. भेटीत दिसलेल्या फोटोत मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आदित्यनाथ, उमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, भगवंत मान, देवेंद्र फडणवीस, मोहन यादव यांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत राज्यांना पुढील सूचना दिल्या:

आर्थिक व व्यापारी स्थिरता राखणे

ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे

नागरिकांचे हित रक्षण करणे

उद्योग व पुरवठा साखळी मजबूत करणे

जमाखोरी व मुनाफाखोरीवर नियंत्रण ठेवणे

कृषी क्षेत्र, विशेषतः खतांच्या साठा व वितरणाचे नियोजन आधीपासून करणे

अफवा व चुकीची माहिती पसरवण्याविरुद्ध नागरिकांना जागरूक करणे

मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे स्वागत केले. त्यांनी जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधनावर उत्पाद शुल्क कमी करणे आणि वाणिज्यिक एलपीजी वितरण वाढवण्याचे निर्णय महत्त्वाचे असल्याचे मानले. तसेच त्यांनी आपली तयारी सुनिश्चित केली की त्यांच्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरेसा उपलब्ध असेल.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande