पंतप्रधान मोदींनी दिल्या बालेन्द्र शाह यांना शपथविधीनिमित्त शुभेच्छा
नवी दिल्ली , 27 मार्च (हिं.स.)।भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन्द्र शाह उर्फ ‘बालेन’ यांना शपथविधीनिमित्त शुभेच्छा दिल्या. भारत-नेपाळ संबंध परस्पर हितासाठी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या सोबत काम करण्यास आ
पंतप्रधान मोदींनी नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांना शपथविधीनिमित्त दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली , 27 मार्च (हिं.स.)।भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन्द्र शाह उर्फ ‘बालेन’ यांना शपथविधीनिमित्त शुभेच्छा दिल्या. भारत-नेपाळ संबंध परस्पर हितासाठी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ वर संदेश देत म्हटले, “नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री बालेन्द्र शाह यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या नेतृत्वावर नेपाळच्या जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे. आपल्या दोन्ही देशांच्या जनतेच्या परस्पर हितासाठी भारत-नेपाळ मैत्री आणि सहकार्य अधिक उंचीवर नेण्यासाठी आपल्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

३५ वर्षीय राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेन शाह यांनी नेपाळचे सर्वात युवा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या पदावर विराजमान होणारे ते देशातील आतापर्यंतचे सर्वात तरुण नेते ठरले आहेत. तसेच मधेश प्रदेशातून सर्वोच्च कार्यकारी पद भूषवणारे ते पहिले व्यक्ती आहेत. त्यांचा शपथविधी नेपाळच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी हा राजकीय बदल घडून आला. युवा पिढीच्या आंदोलनानंतर ओली सरकार सत्तेतून बाहेर पडले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande