स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात; 'मार्ड' आणि 'अमॉम्च' आक्रमक
बीड, 31 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) जवानांची संख्या कमी करण्याच्या निर्णयाला निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आ
स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात; 'मार्ड' आणि 'अमॉम्च' आक्रमक


बीड, 31 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) जवानांची संख्या कमी करण्याच्या निर्णयाला निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) आणि वैद्यकीय अधिकारी संघटना (अमॉम्च) यांनी यासंदर्भात अधिष्ठात्यांना लेखी निवेदन सादर करून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. रुग्णालयात दररोज येणारी रुग्णांची मोठी संख्या आणि त्यांच्यासोबत असणारे अनेक नातेवाईक यामुळे निर्माण होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षारक्षक अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी या निवेदनात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये सक्षम सुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील आपत्कालीन विभाग आणि वॉर्डमध्ये अनेकदा गंभीर परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आणि रुग्णसेवा सुरळीत पार पाडण्यासाठी एमएसएफ जवान मोलाची भूमिका बजावतात. जर सुरक्षारक्षकांची संख्या कमी केली गेली, तर काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांच्या कामात अडथळा निर्माण होऊन त्यांच्या जीवितास आणि रुग्णालय मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. प्रशासनाने या संवेदनशील विषयाचे गांभीर्य ओळखून सुरक्षारक्षकांची संख्या कमी न करता ती कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande