
सोलापूर, 31 मार्च, (हिं.स.)। सोलापूर शहरातील ३ लाख रेशनकार्डधारक कुटुंबांपैकी जेमतेम १० टक्क्यांच्या आतच कुटंब स्टोव्ह वापरत असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. शासनाने तीन लिटर केरोसिन दिल्यानंतर आता अनेकांना नव्याने स्टोव्ह विकत घ्यावा लागणार आहे.युद्ध स्थितीमुळे एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरणाचा निर्णय झाला आहे.
गेल्या १० वर्षात स्टोव्ह वापराची संख्या प्रचंड घटली आहे. सोलापूर शहरात स्टोव्ह वापरणाऱ्या कुटुंबाचा सर्व्हे अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने केला. यामध्ये निराशाजनक माहिती समोर आली आहे.ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. स्थलांतरीत मजूर देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक यांनी शिधापत्रिकाधारक/शिधापत्रिकाधारक नसलेले लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ३ लिटर प्रमाणे केरोसीन वाटप करणार आहेत. एखाद्या गावामध्ये केरोसीन विक्रता उपलब्ध न झाल्यास त्या गावातील रहिवाशांना नजीकच्या गावातून केरोसीन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड