
बीड, 31 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील प्रा. डॉ. महेश भगवानराव चौरे यांना राज्यस्तरीय 'अहिल्या रत्न साहित्यिक' पुरस्कार जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आयोजित सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात त्यांना हा गौरव प्रदान करण्यात येईल. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.
येत्या ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर भूषवणार आहेत. या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. चौरे यांनी सांगितले की, अशा पुरस्कारांमुळे लेखनास नवी ऊर्जा आणि सामाजिक कार्यास मोठे प्रोत्साहन मिळते. त्यांच्या या यशाबद्दल ॲड. जयसिंग चव्हाण, ॲड. संतोष लोमटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. बापूसाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या भव्य संमेलनाचे नियोजन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis