आयपीएल २०२६: वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, 15 चेंडूत अर्धशतकीय खेळी
गुवाहाटी, 31 मार्च (हिं.स.)राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ८ गडी राखून पराभूत करत इंडियन प्रीमियर लीग २०२६ ची दणक्यात सुरुवात केली. पण या सामन्यातील सर्वात चर्चेचा विषय होता युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची विक्रम मोडणारी कामगिरी. सूर्यवंशीने अव
वैभव सूर्यवंशी


गुवाहाटी, 31 मार्च (हिं.स.)राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ८ गडी राखून पराभूत करत इंडियन प्रीमियर लीग २०२६ ची दणक्यात सुरुवात केली. पण या सामन्यातील सर्वात चर्चेचा विषय होता युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची विक्रम मोडणारी कामगिरी. सूर्यवंशीने अवघ्या १५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. त्याने सुरेश रैना, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या क्रिकेटपटूंचा विक्रम मोडला, ज्या सर्वांनी १६ चेंडूंत अर्धशतके पूर्ण केली होती.

१२८ धावांचे लक्ष्य गाठताना सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत पॉवरप्लेमध्ये सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने ६ षटकांत एकही गडी न गमावता ७४ धावा केल्या आणि विजय जवळपास निश्चित केला. युवा स्टार वैभवने १७ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि ७ चौकारांसह ५२ धावा केल्या. अर्धशतकानंतर लगेचच तो बाद झाला असला तरी, तोपर्यंत चेन्नईचे गोलंदाज प्रचंड दबावाखाली आले होते.

या विक्रमी खेळीनंकर वैभवने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला की, माझा सलामीचा साथीदार (जैस्वाल) प्रत्येक चेंडूनंतर माझ्याशी बोलतो आणि मला प्रेरित ठेवतो. एकेरी धावा कधी घ्यायच्या हे तो मला सांगतो, स्ट्राईक माझ्या हातात देतो आणि चेंडू चांगला खेळत असेल तर माझे फटके खेळत राहण्यासाठी प्रोत्साहन देतो. इतकेच नाही, तर तो कधीकधी एकेरी धावा न घेण्याचा सल्ला देतो. शिवाय, आम्ही त्यांना कमी धावसंख्येवर रोखले होते, त्यामुळे पॉवरप्लेमध्ये सामन्याचा निकाल लावणे हे माझे काम होते. प्रशिक्षक माझ्यासोबत आहेत आणि प्रत्येकजण म्हणतो की मी परिस्थितीनुसार माझा नैसर्गिक खेळ खेळावा.

सूर्यवंशी पुढे म्हणाला, मी नेहमी बचावावर लक्ष केंद्रित करतो, पण या सामन्यात आमची योजना पॉवरप्लेमध्ये खेळावर नियंत्रण ठेवण्याची होती, कारण लहान लक्ष्याचा पाठलाग करताना हा टप्पा महत्त्वाचा असतो. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने तिथे चांगली कामगिरी केली, तर सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो, पण आमचा पॉवरप्ले खरोखरच चांगला होता.

त्यानंतर सूर्यवंशीला विचारण्यात आले की, प्रशिक्षक कुमार संगकारा आणि विक्रम राठौर यांनी त्याला दुसऱ्या हंगामासाठी अधिक चांगली तयारी करण्याचा सल्ला दिला होता का, विशेषतः यावेळी गोलंदाज त्याला अधिक लक्ष्य करू शकतात ही शक्यता लक्षात घेता. पण, या युवा क्रिेकेटपटूने स्पष्ट केले की प्रशिक्षकांनी तसे काहीही म्हटले नव्हते, पण बाकी सर्वांनी तसे म्हटले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande