छ. संभाजीनगर - पाच क्रीडा प्रकारांसाठी जिल्ह्यात लवकरच केंद्र सुरू करणार
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ''मिशन लक्ष्यवेध'' योजनेअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीन
छ. संभाजीनगर - पाच क्रीडा प्रकारांसाठी जिल्ह्यात लवकरच केंद्र सुरू करणार


छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'मिशन लक्ष्यवेध' योजनेअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मैदानी स्पर्धा, शूटिंग, बॉक्सिग, वेटलिफ्टिंग आणि हॉकी या पाच क्रीडा प्रकारांसाठी केंद्र सुरू करण्यात येणार असून प्रत्येक प्रकारात २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

राज्यात ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळविण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये खेळाडूंचा सर्वांगीण विकास, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, करिअर मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर

संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्रतेनुसार खेळाडूंचे वय २१ वर्षांखालील असावे तसेच ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांतील किमान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग किंवा पदक ही अट अनिवार्य राहील.

खेळाडूंना मिळणार सुविधा

निवड झालेल्या खेळाडूंना पुरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा, विमा तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रवास खर्च शासनामार्फत देण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र खेळाडूंनी आपले अर्ज १० एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande