
परभणी, 05 मार्च (हिं.स.) : मराठवाडा प्लॉट परिसरातील हनुमान मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील चांदीचा टोप, नाग आणि पितळेची समई चोरी होताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय पानबुडे यांना 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी माहिती मिळाली की, साने चौकातील सार्वजनिक हनुमान मंदिरात चोरी होत आहे. पानबुडे यांनी सीसीटीव्ही पाहणी केली असता आरोपी मंदिरातील अंदाजे 500 ग्रॅम वजनाची पितळेची समई आणि महादेवाच्या पिंडीवरील चांदीचा टोप व नाग, एकूण सुमारे 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करताना दिसला.
आरोपीने शनिवार बाजार परिसरातील महादेव मंदिर व रेणुका माता मंदिरातील पितळेची समई देखील चोरी केली होती. मंदिर समितीचे अध्यक्ष शिलाबाई शेटे यांनी आरोपीचे फोटो व्हाट्सअप ग्रुपवर टाकले, ज्यावरून आरोपीची ओळख आत्माराम उर्फ राजू सिताराम मांगुळकर, रा. पेनुर, ता. लोहा, जि. नांदेड सध्या गणेशपार, परळी, जि. बीड येथे, झाली.
या प्रकरणातील एकूण चोरीचा मुद्देमाल अंदाजे 18 हजार रुपये इतका आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार करीत आहेत.--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis