
चंद्रपूर, 06 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने खेलो इंडिया यांच्या मार्फत मुली व महिलांसाठी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयातील मुली, क्रीडा संस्थांमधील महिला खेळाडू, शासकीय महिला अधिकारी व कर्मचारी, क्रीडाशिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी महिला यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
8 मार्च रोजी सकाळी 8.15 वाजता उद्घाटन, यानंतर सकाळी 9 वाजता 13 वर्षांखालील मुली 100 मीटर धावणे स्पर्धा, 13 ते 18 वयोगटातील मुलींची 200 मीटर धावणे स्पर्धा आणि 18 वर्षांवरील मुली व महिलांची 400 मीटर धावणे स्पर्धा होणार आहे. वरील स्पर्धांचा नोंदणी टाईम सकाळी 8 वाजता आहे.
अटी व शर्ती : या स्पर्धांमध्ये केवळ महिलांनाच सहभागी होता येईल. खेळाडूंनी https://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य. खेळाडूंनी संकेतस्थळावरून प्राप्त झालेले KID नंबर, स्पर्धास्थळी नोंदणी नंबर व आधारकार्ड सादर करूनच स्पर्धेत सहभागी होता येईल. खेळाडूंनी स्पर्धेच्या 30 मिनिटांपूर्वी हजर राहावे.
अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. 9423673232), खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे (मो. 7798174435) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव