नथिंग फोन 4ए सिरीज लॉन्च
मुंबई, 07 मार्च (हिं.स.)। नथिंग या टेक कंपनीने 5 मार्च रोजी आपली नवीन स्मार्टफोन सिरीज नथिंग फोन 4ए जागतिक बाजारासह भारतात लॉन्च केली. लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात या सिरीजमधील दोन मॉडेल्स फोन 4ए आणि फोन 4ए प्रो सादर करण्यात आले. पारदर्शक डिझाइन आ
Nothing Phone 4A Series Launched


मुंबई, 07 मार्च (हिं.स.)। नथिंग या टेक कंपनीने 5 मार्च रोजी आपली नवीन स्मार्टफोन सिरीज नथिंग फोन 4ए जागतिक बाजारासह भारतात लॉन्च केली. लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात या सिरीजमधील दोन मॉडेल्स फोन 4ए आणि फोन 4ए प्रो सादर करण्यात आले. पारदर्शक डिझाइन आणि नवीन ग्लिफ इंटरफेसमुळे ही सिरीज आधीपासूनच चर्चेत आहे.

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास फोन 4ए ची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर फोन 4ए प्रोची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. खरेदीवेळी 1,000 रुपयांची बँक सवलत आणि 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळणार आहे. फोन 4ए ची विक्री 13 मार्चपासून सुरू होणार असून प्रो मॉडेल 27 मार्चपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे.

नवीन फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पारदर्शक लुक आणि “ग्लिफ बार” नावाचा लाइट इंटरफेस. नोटिफिकेशन, टाइमर किंवा व्हॉल्यूम इंडिकेटरप्रमाणे हा इंटरफेस उजळतो. फोन 4ए मध्ये 63 मिनी एलईडी लाइट्स असलेला ग्लिफ बार देण्यात आला आहे, तर प्रो मॉडेलमध्ये 137 एलईडी असलेला अधिक प्रगत “ग्लिफ मॅट्रिक्स” इंटरफेस देण्यात आला आहे. कंपनीने आपले सिग्नेचर ट्रान्सपरंट डिझाइन कायम ठेवत त्यात काही आधुनिक बदल केले आहेत.

कॅमेऱ्याच्या बाबतीतही या सिरीजमध्ये मोठे अपग्रेड देण्यात आले आहे. फोन 4ए मध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला असून तो 70X झूमला सपोर्ट करतो. तर फोन 4ए प्रोमध्ये 50 मेगापिक्सेल सोनी LYT-700c मुख्य सेन्सर, 50 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रो मॉडेलमध्ये तब्बल 140X अल्ट्रा झूमची सुविधा देण्यात आली असून इतक्या झूम क्षमतेचा हा पहिलाच स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

डिस्प्लेच्या बाबतीत फोन 4ए मध्ये 6.78 इंचाचा फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. तर प्रो मॉडेलमध्ये 6.83 इंचाची 1.5K एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे, जी 144Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. परफॉर्मन्ससाठी फोन 4ए मध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसर तर प्रो मॉडेलमध्ये अधिक शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 5400mAh बॅटरी असून ती 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande