रिअलमी C83 5G भारतात लॉन्च
मुंबई, 08 मार्च (हिं.स.)। रिअलमी C83 5G हा नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या या फोनमध्ये मोठी बॅटरी, स्मूथ परफॉर्मन्स आणि ५जी कनेक्टिव्हिटीवर विशेष भर देण्यात आला आहे. कंपनीच्या सी
Realme C83 5G smartphone


मुंबई, 08 मार्च (हिं.स.)। रिअलमी C83 5G हा नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या या फोनमध्ये मोठी बॅटरी, स्मूथ परफॉर्मन्स आणि ५जी कनेक्टिव्हिटीवर विशेष भर देण्यात आला आहे. कंपनीच्या सी सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन असून गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी तो चांगला पर्याय मानला जात आहे.

या फोनची किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी १३,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १४,४९९ रुपये असून ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १७,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना सहा महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचाही पर्याय दिला आहे. फ्लिपकार्ट, कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि विविध रिटेल स्टोअर्सवरून या फोनची विक्री करण्यात येणार आहे.

या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यामधील ७००० mAh क्षमतेची टायटन बॅटरी. या मोठ्या बॅटरीमुळे दिवसभर सोशल मीडिया वापर, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा गेमिंग करताना चांगला बॅकअप मिळतो. फोनमध्ये १५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला असून ५ वॅट रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 (६ नॅनोमीटर) प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी आणि ६ जीबी रॅमचे पर्याय उपलब्ध असून ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. डायनॅमिक रॅम एक्सपॅन्शन तंत्रज्ञानामुळे एकूण १८ जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅम वापरण्याची सुविधा मिळते. तसेच २ टीबीपर्यंत मेमरी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे.

फोनमध्ये ६.८ इंच आकाराचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा १४४ हर्ट्झ अॅडाप्टिव्ह रिफ्रेश रेट स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन अधिक स्मूथ बनवतो. दीर्घकाळ वापर करताना फोन गरम होऊ नये यासाठी ५३३४ चौरस मिलीमीटर व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. एआय आउटडोअर मोडमुळे बाहेर वापरताना स्क्रीनची ब्राइटनेस आणि ऑडिओ आपोआप वाढतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सेल एआय रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. दैनंदिन वापरासाठी हा कॅमेरा योग्य मानला जातो. टिकाऊपणासाठी फोनमध्ये मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स तसेच आयपी६४ डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स दिले आहे. त्यामुळे फोन पडल्यास किंवा पाणी आणि धुळीतही त्याचे संरक्षण होते. हा स्मार्टफोन ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande