रशियात मोठा विमान अपघात; 29 जणांचा मृत्यू
मॉस्को, 01 एप्रिल (हिं.स.) : रशियाच्या क्रीमिया येथे एक भीषण विमान अपघात घडला असून यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, एंटोनोव-26 हे सैन्याचे वाहतूक विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 31 मार्च रो
संग्रहित फोटो


मॉस्को, 01 एप्रिल (हिं.स.) : रशियाच्या क्रीमिया येथे एक भीषण विमान अपघात घडला असून यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, एंटोनोव-26 हे सैन्याचे वाहतूक विमान कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 31 मार्च रोजी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार सुमारे 6 वाजता) हा अपघात झाला. विमान नियमित उड्डाणावर असताना अचानक त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. शोध आणि बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त ठिकाणाचा शोध लावला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 6 कर्मचारी सदस्य आणि 23 प्रवासी होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला असून कोणताही जीवित बचावलेला नाही.प्राथमिक तपासात विमानाच्या अवशेषांवर बाह्य हल्ल्याचे कोणतेही चिन्ह आढळलेले नाही. त्यामुळे तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande