हेलिकॉप्टरमध्ये हिरो सारखी एन्ट्री ते स्फोट;  'इन्स्पेक्टर मंजू'च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना दिला धक्का
मुंबई, 01 एप्रिल, (हिं.स.)। ''इन्स्पेक्टर मंजू'' मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकमेकांमधील गैरसमज दूर करून सत्या आणि मंजू पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांना वेगळं करण्यासाठी आर्यन प्रत्येक वेळी नवा डाव आखतो. मात्
हेलिकॉप्टरमध्ये हिरो सारखी एन्ट्री ते स्फोट,  'इन्स्पेक्टर मंजू'च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना दिला धक्का


मुंबई, 01 एप्रिल, (हिं.स.)। 'इन्स्पेक्टर मंजू' मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकमेकांमधील गैरसमज दूर करून सत्या आणि मंजू पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांना वेगळं करण्यासाठी आर्यन प्रत्येक वेळी नवा डाव आखतो. मात्र, सत्या–मंजूमधील विश्वास आणि प्रेम नेहमीच जिंकताना दिसतं. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे. प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून सत्या आणि मंजूमध्ये पुन्हा दुरावा येणार का, हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे.

मम्मीसाहेब आजारी असल्यामुळे सत्या पक्षाच्या कामासाठी दिल्लीला जाण्यास निघतो. मंजू त्याला जाण्यास नकार देते, पण पक्षाकडून बोलावणं आल्यामुळे जावंच लागेल असं सांगत सत्या निघतो. पुढे या प्रोमोमध्ये हेलिकॉप्टरचा स्फोट झाल्याचं दिसून येतं. हा अपघात आहे की कुणाचा कट? सत्या सुरक्षित आहे का? की सत्या-मंजूवर पुन्हा संकटाचं सावट? या थरारक प्रोमोवर प्रेक्षकांनी “सत्या–मंजू कधीही वेगळे होऊ शकत नाहीत.”अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या भागात नेमकं काय घडणार, हे २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता 'सन मराठी'वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या प्रोमोबद्दल सत्या म्हणजेच अभिनेता वैभव कदम म्हणाला की, नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांचे खूप मेसेज येत आहेत. खरंच तुझा अपघात होणार आहे का? आणि मंजूच्या आयुष्यातून सत्याची एक्सिट होणार आहे का ? अश्याप्रकारचे बरेच प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत. आता पर्यंतचा सगळ्या मोठा ट्विस्ट सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. हेलिकॉप्टर चा हा सीन शूट करण्यासाठी आमची टीम साताऱ्याहून पुण्याला गेलेली. १ तासात आम्ही हा सीन शूट केला आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये हिरोला हेलिकॉप्टर मधून एन्ट्री करताना मी पाहिलंय. माझ्या आयुष्यातही असा क्षण येईल मी हा विचार केला नव्हता. तो क्षण मी जगलो याचा मला खूप आनंद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande