आयपीएल 2026 : पंजाबची गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने मात
चंदीगड, 01 एप्रिल (हिं.स.) कूपर कॉनॉलीच्या शानदार फंलदाजीच्या जोरावर, पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभूत करत हंगामाची सुरुवात विजयाने केली. प्रथम फलंदाजी करताना, गुजरातने २० षटकांत सहा विकेट्स गमावून १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात
कूपर कॉनॉली


चंदीगड, 01 एप्रिल (हिं.स.) कूपर कॉनॉलीच्या शानदार फंलदाजीच्या जोरावर, पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभूत करत हंगामाची सुरुवात विजयाने केली. प्रथम फलंदाजी करताना, गुजरातने २० षटकांत सहा विकेट्स गमावून १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पदार्पण करणाऱ्या कॉनॉलीने एक शानदार नाबाद अर्धशतक झळकावून पंजाब किंग्सला १९.१ षटकांत सात विकेट्स गमावून १६५ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. एका क्षणी पंजाब किंग्सची परिस्थिती बिकट झाली होती, पण कॉनॉलीने स्वतःला सावरले आणि संघाला विजयाकडे नेले.

पंजाबने आयपीएल २०२६ हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पंजाबला हा सामना जिंकता आला असेल, तर त्याचे बहुतांश श्रेय कॉनॉलीला जाते, जो शेवटपर्यंत नाबाद राहिला. कॉनॉली ४४ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांसह ७२ धावांवर नाबाद राहिला. प्रभसिमरन सिंगनेही ३७ धावा केल्या. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन बळी घेतले, तर रबाडा, अशोक, रशीद आणि वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातने पंजाबला सुरुवातीलाच धक्का दिला. इम्पॅक्ट प्लेअर प्रियांश आर्य सात धावांवर बाद झाला. त्यानंतर कॉनोली आणि प्रभसिमरन सिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून पंजाबला सावरले. मात्र, रशीदने प्रभसिमरनला बाद करून ही भागीदारी तोडली. सामन्यादरम्यान रिमझिम पाऊसही पडत होता, त्यामुळे पंजाबला आक्रमक फलंदाजी करण्यास भाग पडले. श्रेयसनेही दोन षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते. पण प्रसिद्ध कृष्णाने श्रेयस (१८), शशांक सिंग (४) आणि मार्कस स्टोइनिस (०) यांना बाद करून पंजाबला अडचणीत आणले. तरीही, कॉनोली शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला. पंजाबकडून, झेवियर बार्टलेट एका षटकारासह पाच चेंडूंमध्ये ११ धावा करून नाबाद राहिला.

गुजरात टायटन्सने पंजाब किंग्ससमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने २० षटकांत सहा गडी गमावून १६२ धावा केल्या. गुजरातसाठी कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर जोस बटलरने ३८ धावा केल्या. गुजरातने चांगली सुरुवात केली, पण संघाला ती गती कायम राखता आली नाही. शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीप सिंगने ११ चेंडू टाकले, ज्यात चार वाईड आणि एक नो-बॉल होता. पंजाबकडून विजयकुमार विशाखने तीन, युझवेंद्र चहलने दोन आणि मार्को जॅनसेनने एक बळी घेतला.

पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक नकोसा विक्रम रचला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपचा समावेश झाला आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीप सिंगने ११ चेंडू टाकले, ज्यात चार वाईड आणि एक नो-बॉल होता. अर्शदीपच्या आधी मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, संदीप शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनीही आयपीएलमध्ये एका षटकात ११ चेंडू टाकले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande