
रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : ससाळे (ता. राजापूर) येथील सुकन्या आणि राजापूरच्या विश्वनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी निधी मनोज सप्रे हिने ५९ व्या महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बारा वर्षांखालील मुलींच्या गटात तिने सलग दुसऱ्या वर्षी तिने राज्य विजेतेपद पटकावून राजापूरचे नाव उज्ज्वल केले आहे.
निधीने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली असून तिच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण तालुक्यात अभिमानाचे वातावरण आहे. तिचे वडील व मार्गदर्शक मनोज सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने यासाठी सातत्याने कठोर परिश्रम घेतले.
सलग दोन वेळा राज्य विजेतेपद मिळवल्यानंतर आता पुढील वर्षीही विजयाची हॅट्रिक साधण्याचे उद्दिष्ट निधीने ठेवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी