मेलानिया ट्रम्प यांनी एपस्टीन प्रकरणाशी संबंध नाकारला
वॉशिंग्टन , 10 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी गुरुवारी जेफ्री एपस्टीन यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचे ठामपणे फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत.
मेलानिया ट्रम्प यांनी एपस्टीन प्रकरणाशी संबंध नाकारला


वॉशिंग्टन , 10 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी गुरुवारी जेफ्री एपस्टीन यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचे ठामपणे फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये दिलेल्या निवेदनात मेलानिया ट्रम्प म्हणाल्या की, त्यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या या अफवा त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न आहेत. आरोप करणाऱ्यांवर टीका करत त्यांनी म्हटले की, अशा लोकांमध्ये नैतिकता आणि आदराची कमतरता आहे. “माझे आणि एपस्टीन यांना जोडणारे हे खोटे आरोप आता थांबायला हवेत. हा फक्त माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मेलानिया ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांचा एपस्टीन किंवा त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्याशी कोणतीही मैत्री किंवा जवळीक नव्हती. मात्र, त्यांनी मान्य केले की न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामधील काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते एकाच सामाजिक वर्तुळात उपस्थित होते.

मॅक्सवेलला पाठवलेल्या एका ईमेलच्या उत्तराबद्दल त्यांनी सांगितले की, तो केवळ सामान्य संवाद होता आणि त्याला विशेष महत्त्व नाही. मेलानिया यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या वकिलांच्या मदतीने या आरोपांविरोधात कायदेशीर लढा दिला असून त्यात त्यांना यशही मिळाले आहे.

याशिवाय, मेलानिया ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेला (काँग्रेस) आवाहन केले की, एपस्टीन प्रकरणातील पीडितांसाठी सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी, जेणेकरून त्यांना आपली बाजू मोकळेपणाने मांडता येईल. “प्रत्येक महिलेला तिची कथा सार्वजनिकरित्या मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. तेव्हाच सत्य समोर येईल,” असे त्या म्हणाल्या.

हे विधान अशा वेळी समोर आलं आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन या वादातून पुढे जात असल्याचे दिसत होते. इराण युद्धासारख्या मोठ्या मुद्द्यांमुळे हे प्रकरण काहीसे शांत झाले होते, मात्र मेलानिया यांच्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande