इस्रायलच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर आसिफ यांनी सोशल मीडिया पोस्ट हटवली
इस्लामाबाद, 10 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इस्रायलविषयी तीव्र टिप्पणी केल्यानंतर त्यांनी आपली सोशल मीडिया पोस्ट हटवली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रं
इस्रायलच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर आसिफ यांनी सोशल मीडिया पोस्ट हटवली


इस्लामाबाद, 10 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इस्रायलविषयी तीव्र टिप्पणी केल्यानंतर त्यांनी आपली सोशल मीडिया पोस्ट हटवली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

माहितीनुसार, ख्वाजा आसिफ यांनी सुरुवातीला इस्रायलवर टीका करत त्याला “मानवतेसाठी अभिशाप” असे संबोधले होते आणि कथितरित्या “नरकात जळावे” अशा कठोर शब्दांचा वापर केला होता. या विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि वाद वाढला. प्रकरण चिघळल्यानंतर त्यांनी ‘एक्स’वरून आपला पोस्ट हटवली. मात्र, याबाबत पाकिस्तान सरकार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलच्या विनाशाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे विधान कोणत्याही सरकारकडून सहन केले जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा ते स्वतःला शांततेचे समर्थक म्हणवतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर इस्रायलला “वाईट” आणि “मानवतेसाठी अभिशाप” असे म्हटले होते. त्यांनी लेबनानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला नरसंहार असे संबोधत निर्दोष लोकांचे जीव जात असल्याचा आरोप केला होता.

या वक्तव्यावर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त करत ते अत्यंत गंभीर आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. परिणामी, हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे याला कूटनीतिक तणावाचे रूप मानले जात आहे, तर दुसरीकडे दोन्ही देशांमधील वाढत्या शब्दयुद्धाचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande